बदलत्या आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे येणाऱ्या आजारांना 'जीवनशैलीचे विकार' / 'लाइफस्टाइल आजार' असे म्हणतात. आपल्यास जीवनशैलीचे विकार असल्यास आपल्याला व्यायामाबद्दल प्रश्न असू शकतात. आपण किती वेळा व्यायाम करू शकता? कोणते व्यायाम सुरक्षित आहेत? व्यायाम आणि जीवनशैली आजारांबद्दलची मूलभूत गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. . .
या लेखात आम्ही दीर्घकालीन विकारांचे हानिकारक प्रभाव टाळण्यासाठी आणि आपले आरोग्य राखण्यासाठी व्यायामाच्या महत्वाबद्दल चर्चा करणार आहोत!
जीवनशैली विकार म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीच्या जगण्याच्या वर्तनाशी आणि मार्गाशी संबंधित असलेले आजार. हे सहसा शारीरिक हालचालींच्या अभावामुळे, आरोग्यास निरोगी खाण्यामुळे आणि धूम्रपान व मद्यपानचा गैरवापर केल्यामुळे होतो. अहवालात असे दिसून आले आहे की भारतातील 3 पैकी 1 तरुण जीवनशैलीच्या आजाराने ग्रस्त आहेत! परंतु अभ्यासातून असे दिसून आले आहे की त्यापासून मुक्त होण्यासाठी बऱ्याच लोकांकडून पुरेसे प्रयत्न केले जात नाहीत.
Credits REHAB STATION
कोण कोणते जीवनशैली विकार आहेत?
जीवनशैलीच्या आजारांमध्ये काही प्रमुख नावे म्हणजे हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, पॅरालिसिस, वजनवाढ, ऑस्टियोपोरोसिस, संधिवात थायरॉइड विकार, फॅटी लिव्हर, पीसीओडी आणि एथेरोस्क्लेरोसिसचा समावेश आहे. त्याचबरोबर लठ्ठपणा, कमी व्यायाम, बैठी जीवनशैली, चुकीचे व्यायाम, धूम्रपान, मद्यपान आणि मादक पदार्थांच्या गैरवापर हे जोखीम घटके समजले जातात.
फिजिओथेरपी व्यायामामुळे दीर्घकालीन आजार कसे सुधारले जाऊ शकते?
नियमित मार्गदर्शनाखाली केलेल्या व्यायामामुळे आपली लक्षणे व्यवस्थापित करण्यास आणि आपले आरोग्य सुधारण्यास मदत होते. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायामाचे 3 प्रकार आवश्यक आहेत. हे आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करणे महत्वाचे आहे.
1. कार्डियो / एरोबिक व्यायाम - हे आपल्या हृदयाची गती वाढवते, ज्यामुळे आपले रक्त पंप जलद होते. हे आपल्या संपूर्ण शरीरात अधिक ऑक्सिजन वितरीत करते आणि आपले हृदय आणि फुफ्फुसांचे आरोग्य राखते. ज्याने आपल्या हृदयाचे आरोग्य आणि खूप वेळ काम करण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते.
2. ताकद वाढवीचे व्यायाम (Strengthening exercises) - स्नायूंची शक्ती आणि संद्याची मजबुती सुधारण्यात मदत करते. ह्यामुळे दररोजचे क्रियाकलाप करणे सोपे होते आणि सांध्यांना स्थिरता मिळते.
3. लवचिकतेचे व्यायाम (Stretching exercises) - आपणास आपल्या सांद्यांची पूर्ण हालचाल
मिळावी जेणेकरून ते सर्वोत्कृष्ट कार्य करतील आणि स्थिरता व्यायामामुळे पडण्याचा (फॉल्सचा) धोका कमी होण्यास मदत होते.
व्यायामामुळे दीर्घकालीन स्थिती कशी सुधारली जाऊ शकते? तसेच कोणते व्यायाम करणे सुरक्षित आहेत?
नियमित व्यायामामुळे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट आजार होण्याचा धोका कमी होतो. तथापि, व्यायामाची पद्धत सुरू करण्यापूर्वी आपल्या फिजिओथेरपीस्टशी/ डॉक्टरांशी बोलणे महत्वाचे आहे. कोणता व्यायाम सुरक्षित आहे आणि व्यायाम करताना आपल्याला कोणती खबरदारी घ्यावी लागेल याबद्दल सल्ला घेणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ:
1. हृदयरोग: नियमित व्यायामामुळे (उदा: चालणे, जॉगिंग करणे, कमी-प्रभाव असलेल्या एरोबिक्स, पोहणे आणि पाण्याचे एरोबिक्स) आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. अलीकडच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की मार्गदर्शनाखाली केलेले व्यायाम आणि त्यामध्ये हळूहळू केलेली वाढ हृदयरोग असलेल्या लोकांमध्ये चांगली हृदय क्रिया आणि महत्त्वपूर्ण फायदे करून देते.
2. मधुमेह - नियमित व्यायामामुळे इन्सुलिन आपल्या रक्तातील साखरेची पातळी अधिक प्रभावीपणे कमी होण्यास मदत होते. आपले शारीरिक क्रियाकलाप सोपी वजन नियंत्रित करण्यात आणि आपली उर्जा वाढविण्यात मदत करतात. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने (एडीए) सूचित केले आहे की किमान अडीच तास दर आठवड्याला मध्यम ते जोरदार तीव्रतेचे शारीरिक व्यायाम करणे फायद्याचे आहे. जसे की तेज चालणे, पाण्याचे व्यायाम, पोहणे किंवा जॉगिंग करणे.
3. उच्च रक्तदाब: जर आपले हृदय मजबूत असेल तर हृदय पंप करण्यासाठी लागणारी शक्ती कमी लागते,त्याने आपल्या रक्तवाहिन्यांवरील जोर कमी होतो आणि तसेच रक्तदाब कमी होते. एरोबिक व्यायाम उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. परंतु लवचिकता आणि ताकद वाढवीचे व्यायाम हे देखील संपूर्ण फिटनेस योजनेचे महत्त्वपूर्ण भाग आहेत.
4. ऑस्टियोपोरोसिस/ संधिवात: व्यायामामुळे वेदना कमी होऊ शकतात, प्रभावित सांध्यामध्ये स्नायूंची ताकद टिकवून ठेवता येते आणि सांधे कडक होणे कमी होते. ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस/संधिवात आहे अशा लोकांसाठी शारीरिक कार्य आणि जीवनशैली सुधारू शकते. पूर्ण हालचाल आणि लवचिकतेचे व्यायाम चांगले रोगनिदान करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत.
किती वेळा, किती आणि किती तीव्रतेने व्यायाम सुरक्षितपणे करू शकतो?
फिजिओथेरपीस्टची मदत घेतल्यास ते वेदना कमी करण्यासाठी किंवा सामर्थ्य वाढविण्यासाठी विशिष्ट व्यायामाचा सल्ला देतील. आपल्या स्थितीनुसार आपण कदाचित काही व्यायाम पूर्णपणे टाळणे गरजेचे असू शकते किंवा दुखण्याची पाळी/ चढाओढ टाळण्याची देखील आवश्यकता असू शकते. काही बाबतीत, आपल्याला व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या फिजिओथेरपीस्टचा सल्ला घेणे उत्तम ठरेल.
Credits REHAB STATION
आम्ही रिहॅब स्टेशन मध्ये तज्ञ फिजिओथेरपिस्टची टीम आहोत जी आपल्याला स्वस्थ होण्यासाठी मार्गदर्शन करते. आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही परिपूर्ण तपासणी (मस्क्यूलोस्केलेटल) करतो जे आपल्याला सामर्थ्य आणि कमकुवत बिंदू ओळखण्यात मदत करू शकते! मूल्यांकनांवर आधारित, आम्ही वैयक्तिकृत ध्येय निर्देशित व्यायामाच्या योजना तयार करतो ज्या आपल्या फिटनेस कारकिर्दीत सुरुवातीचा बिंदू असू शकते. दुखापती टाळण्यासाठी आणि त्याचबरोबर आपली कार्यक्षमता सुधारण्यासाठी योग्य व्यायाम कसे करावे, योग्य स्नायू कसे वापरावे यासाठी आम्ही आपल्याला
योग्य मार्ग दर्शन करतो!
- टीम रिहॅब स्टेशन
अधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी येथे संपर्क साधावा :
व्हॉट्सऍप/ कॉल : +९१ ८८८८८ ३३५०८
ई-मेल : rehabstationpune@gmail.com
वेबसाईट: www.rehabstation.in