व्हर्टिगो हा एक सामान्य त्रास झाला आहे पण व्हर्टिगो म्हणजे नक्की काय हे सर्वांना माहित नाही . उंच ठिकाणावरून खाली पाहिल्यावर जी चक्कर येते किंवा गाडीतून प्रवास करताना चक्कर येते त्याला सगळे व्हर्टिगो म्हणतात. पण तसे नसून व्हर्टिगो ची लक्षणे हि वेगळे व ठराविक आहेत.
व्हर्टिगो ची लक्षणे:
१. आपण हालत नसताना हल्ल्यासारखे वाटणे
२. चक्कर आल्यावर आपण फिरत आहोत किंवा आपल्या आजूबाजूचे सगळे फिरत आहे असे वाटणे
३. एका बाजूला मान वाळवल्यावर चक्कर येणे व त्या दिशेने तोल जाऊन पडणे
४. चक्कर आल्यावर मळमळणे किंवा उलटी होणे
५. कानात आवाज येणे किंवा कमी ऐकू येणे
व्हर्टिगोची चक्कर १-२ मिनिटे राहते व त्याचा त्रास पुढील २-३ तास किंवा दिवसभर होतो.
Credits: Southern ENT Associatesहा आजार कशामुळे होतो?
कानातल्या बॅलन्सच्या यंत्रणेतील हा एक बिघाड आहे. तो नक्की कशामुळे होतो याचे काही प्रमुख कारण नाही. खालील काही कारणांमूळे व्हर्टिगो होऊ शकतो:
१. मधुमेह
२. कानाचे इन्फेक्शन किंवा सर्जरी
३. बी पी चा त्रास
४. डोक्याच्या इन्जुरीज
५. मायग्रेन
व्हर्टिगोवर इलाज काय?
पोसिशनल व्हर्टिगो वर फिजिओथेरपीने कायमचा उपचार होतो. कानातल्या बॅलन्स सिस्टीम मध्ये कॅल्शिअमचे कण सुटून बाहेर येतात व ते सिस्टीम मध्ये फिरतात. त्यामुळे मेंदूला चुकीची माहिती मिळते व आपल्याला चक्कर येते आणि तोल जातो. मानेच्या विशिष्ठ हालचालींनी ते कण आत घालवता येतात व चक्कर लगेच जाते.
ते कण जर का आत गेले नाहीत तर कुठेतरी ते अडकून राहतात व काही दिवसांनी किंवा वर्षांनी चक्कर परत येत राहते व आपली रोजची कामे करण्याचा किंवा बाहेर जाण्याचा आत्मविश्वास ढळतो. म्हातारपणात व्हर्टिगोमुळे पडले तर फ्रॅक्चर होऊ शकते किंवा डोक्याला मार लागू शकतो.
व्हर्टिगो वर फिजिओथेरपी मध्ये चाचणी व उपचार दोन्ही आहेत. औषध न घेता तुम्ही या त्रासावर लवकर उपचार करू शकता!
डॉ. सुकन्या दांडेकर (पी . टी.)
न्युरोफिजिओथेरपीस्ट
रिहॅब स्टेशन, पुणे